विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग…

mumbai – विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग लागल्याची घटना घडली आहे. सोमवार १९ मे दुपारच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या स्कॅनिंग मशीनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दररम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले कि, विधान भवनाच्या रिसेप्शन एरियात जी स्कॅनिंग मशीन असते, त्यात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे छोट्या प्रमाणात ही आग लागली आहे. ती नियंत्रणात आणण्यात आलेली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्यादेखील येत आहेत. आग विझवण्यात आलेली आहे. त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. प्राथमिक माहितीनुसार, स्कॅनिंग मशीनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची माहिती आहे. सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. आता अग्निशमन दलाच्या गाड्या येऊन तपासणी करणार आहेत.