मुंबई

मुंबईतील टँकर चालकांचा संप मागे…

mumbai – मुंबईतील टँकर असोसिएशनचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. मुंबई टँकर असोसिएशनसोबत झालेल्या चर्चेनंतर शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. मुंबईतील पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर चालकांनी बुधवार मध्यरात्रीपासूनच संप पुकारला होता. त्यामुळे, मुंबईतील अनेक ठिकाणी या संपाचा फटका बसत होता.

दरम्यान, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी टँकर चालकांच्या शिष्टमंडळाची तातडीची बैठक बोलावली आणि या बैठकीत संपावर अखेर तोडगा निघाला आणि टँकर असोसिएशनने संप मागे घेतला.

याबाबत बोलताना आमदार मुरजी पटेल म्हणाले कि, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या प्रयत्नाने टँकर असोसिएशनने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. टँकर असोसिएशनचे म्हणणे सरकारने ऐकून घेतले आहे. टँकर असोसिएशनला ज्या नोटीस दिल्या होत्या, त्या सर्व मागे घेण्यात येत आहेत शिवाय कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नसल्याचे आश्वासन मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहे असे पटेल म्हणाले. 

त्यानंतर टँकर असोसिएशनच्यावतीने  आम्ही संप मागे घेत आहोत अशी घोषणा करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page