मुंबई

ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन…

mumbai – हिंदी चित्रपट सृष्टीचे सुप्रसिद्ध ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक आणि प्रतिभावंत अभिनेते मनोज कुमार यांचे शुक्रवारी (4 एप्रिल) सकाळी निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.

मनोज कुमार यांच्यावर काही दिवसांपासून मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीसह संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, मनोज कुमार यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत शहीद, पुरब और पश्चिम, हिमालय की गोद मै, हरियाली और रास्ता, रोटी कपडा और मकान, क्रांती अशा विविध सिनेमात मुख्य भूमिका साकारल्या. देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मनोज कुमार यांना ‘भारतकुमार’ या नावाने ओळखले जात असे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page