मुंबई

गुजरातमधून महाराष्ट्रात गुटखा येतो – विजय वडेट्टीवार…

mumbai – महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुटखा हा गुजरातमधून येतो. आज गुटख्यामुळे अनेक लोक मरत आहेत. सरकारने एकतर कडक कारवाई करावी किंवा गुटख्यावरील बंदी उठवावी, असे वक्तव्य विधानसभेचे माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केले.

राज्यात गुटख्यावर बंदी असताना देखील सगळीकडे गुटखा सर्रासपणे उपलब्ध आहे. अस असताना याबाबत कठोर कारवाई होत नाही, लक्षवेधी माध्यमातून विजय वडेट्टीवार यांनी सरकारला प्रश्न विचारले.

इतर राज्यात गुटखा बंदी नाही पण महाराष्ट्रात बंदी असताना मात्र गुटखा सगळीकडे उपलब्ध आहे. गुजरात मार्गे महाराष्ट्रात गुटखा येताना कारवाई नाही. यामुळे सरकारचा महसूल बुडतो. हा गुटखा येतो , पोलिसांनी मनात आणले तर एक ही पुडी विकू शकत नाही पण तरीही विदर्भ, मराठवाडा इथे गुटखा मिळतो, लोकांच्या आरोग्याला यामुळे हानी पोहचते.

यावर उत्तर देताना मंत्री योगेश कदम यांनी गुटखा बाबत अन्न आणि प्रशासन विभाग कारवाई करण्यात येते. या विभागात फूड ऑफिसर्सची कमतरता आहे. पण दोन महिन्यात या नियुक्त्या करण्यात येतील आणि गुटखा विक्रीवरील कारवाया वाढणार. या प्रकरणी कोणताही व्यापारी, विक्रेते ,पुरवठादार यांच्यावर कठोर कारवाई करणार असे मंत्री कदम म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page