मुंबई
मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर…
मुंबई – मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले आहे. विधानसभेत आज मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते. या अधिवेशनात आवाजी मतदानाने हे विधेयक एकमताने मंजूर झाले.
अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणामागील आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर एकमताने मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर करण्यात आले. या विधयेकामुळे मराठा समाजाला आता शैक्षणिक संस्था आणि नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण असणार आहे.