बोरीवली पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह तिघांवर गुन्हा दाखल…

मुंबई – बोरीवली पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक अशा तिघांवर न्यायालयाच्या आदेशाने मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला आहे. सुधीर कालेकर, अरविंद घाग आणि स्वप्नाली मांडे अशी या तिघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी बोरिवली पोलीस ठाण्यात त्यांचे पती व सासरच्या लोकांविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासा दरम्यान फिर्यादी यांचे स्त्रीधन हस्तगत करून देण्याकरिता, तसेच गुन्ह्यात तक्रारदार यांचा 164(5)(अ) अन्वये न्यायालयात जबाब नोंद करण्याकरिता आणि आरोपींना कडक शासन करण्याकरिता वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांच्यावतीने पोलीस उप निरीक्षक यांनी रु. ५,००,०००/- ची लाचेची मागणी करून त्यातील रु. २,२५,०००/- स्विकारले असा तक्रार अर्ज फिर्यादी यांनी या तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्याकरिता न्यायालयात सादर केला असता, न्यायालयाने सीआरपीसी. कलम 156(3) प्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक यांच्याविरुद्ध कलम 7 भ्र. प्र. अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिल्याने एसीबीने या तिघांविरुद्ध एम.ई.सी.आर. (MECR) 04/2024 अन्वये गुन्हा नोंद केला आहे.