महाराष्ट्र

पुण्यात ATSची मोठी कारवाई…

PUNE – पुण्यात दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. दहशतवाद विरोधी पथकाने कोंढवा परिसरात सुरू असलेल्या बनावट टेलिफोन एक्सचेंजवर छापा टाकून बनावट सिम कार्डचे रॅकेट उद्धवस्थ केले. या छाप्यात तब्बल ३७८८ सिम कार्ड, सिम बॉक्स, वायफाय आणि सिम्बॉक्स चालवण्याकरता वापरण्यात येणारे अँटिना, लॅपटॉपसह मोठा मुद्देमाल दहशतवाद विरोधी पथकाने जप्त केला आहे.

कोंढव्यातील मिठानगर येथे असलेल्या एम. कॉम्प्लेक्स परिसरात अनधिकृत एक्सचेंज सेंटर सुरु असल्याची माहिती  दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुषांगाने दहशतवाद विरोधी पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला. दरम्यान, या कारवाईत नौशाद अहमद सिद्धी या २२ वर्ष तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page