मुंबई

अखेर बाबा रामदेव यांनी मागितली माफी…

मुंबई – योगगुरू बाबा रामदेव यांनी महिलांच्या कपड्यांबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्याविधानाबाबत त्यांनी माफी मागितली आहे. राज्य महिला आयोगाकडे लेखी स्वरूपात त्यांनी ही माफी मागितली असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत दिली आहे.

बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांनी ठाणे येथील एका सार्वजानिक कार्यक्रमात महिलांसंबंधी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विधान केले होते. या वक्तव्याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांना याबाबतीत आपला खुलासा दोन दिवसाच्या आत सादर करण्यासाठी नोटिस पाठवली होती ,याबाबतीत त्यांचा खुलासा आयोग कार्यालयास प्राप्त झाला असून केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी माफी मागितली आहे, असं ट्वीट रुपाली चाकणकर यांनी केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page