मुंबई

मोटारकारसह, अग्नीशस्त्र व जिवंत काडतूस बाळगणाऱ्यास अटक…

मुंबई – दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दिल्ली येथून चोरी केलेल्या २ मोटारकारसह तसेच विनापरवाना अग्नीशस्त्र आणि जिवंत काडतूस जवळ बाळगणाऱ्या एकास कांदिवली पोलिसांनी अटक केली. फरहान हनीफ कुरेशी उर्फ सोनू असे याचे नाव आहे.

कांदिवली पोलीस ठाणे हद्दीत १ इसम गावठी कट्टा घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुषंगाने पोलिसांनी कांदिवली पश्चिम मुंबई येथील गरुडा पेट्रोल पंप समोर मेरेडियन बार, फुटपाथ वर लिंक रोड या ठिकाणी सापळा रचून फरहान हनीफ कुरेशी उर्फ सोनू यास अटक केली. त्याच्याकडे विनापरवाना गावठी कटटा आणि १ काडतूस मिळून आले. सदर बाबत त्याच्या विरुध्द कांदिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याने साथीदाराच्या मदतीने दिल्ली या ठिकाणाहून २ मोटार कार चोरी केली असल्याचे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page