मुंबई
ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन…

मुंबई – बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन झाले. पहाटे ४.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराने ग्रस्त होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
बाली यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. केदारनाथ, 3 इडियट्स सारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.