जैन मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्यास डोंबिवली पोलिसांनी केली अटक…

डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील ३ जैन मंदिरांमध्ये चोरी करणा-यास राम नगर पोलिसांनी अटक केली. नरेश अगरचंद जैन असे याचे नाव आहे.
डोंबिवली पूर्वेतील आदिनाथ गृह जिनालय मंदिर, श्री पार्श्वगज जैन संघ चरीटेबल ट्रस्ट मंदिर आणि शांतीलाल मंदिर अशा ३ जैन मंदिरातून २ चांदीची फुले, १ चांदीचा नारळ, १ बांदीची आरतीची थाळी, १ चांदीचा दिवा, १ चांदीचा कलश अशा एकूण १५७० ग्रॅम वजनाच्या एकूण ९५,०००/- रू. किंमतीच्या चांदीच्या वस्तू चोरी झाल्या असल्याबाबत डोंबीवली पोलीस ठाण्यात गुरनं । ७९/२०२४ भादवि क. ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे नरेश अगरचंद जैन यास अटक करून त्याच्याकडून ८०,०००/- रू. किंमतीची, १०९८.२० ग्रॅम वजनाची ९९.९ टंचाची, चांदीची लगड हस्तगत केली.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस उप आयुक्त गुंजाळ, सपोआ, डोंबीवली विभाग कुराडे, वपोनि नितीन गिते, पोनि (गुन्हे) आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबीवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि बळवंत भराडे, पोहवा सुनिल भणगे, पोहवा विशाल वाघ, पोहवा सचिन भालेराव, पोहवा तुळशीराम लोखंडे, पोना हनुमंत कोळेकर, पोअं शिवाजी राठोड यांनी केली.